क्रीपटो करन्सी, सध्य स्थित आणि विचार विनिमय
जे लोक सध्या बिटकोईन, इथेरियम सारख्या क्रीपटो करन्सी वर गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांचे साठी हा लेख आहे.
भारतात, रुपया अजूनही पूर्णपणे परिवर्तनिय (convertable ) झालेला नाही म्हणजेच, भारतीय चलनावावर फेमा या कायध्याचे आधीराज्य आहे आणि नियंत्रित प्रमाणात इतर करन्सी मध्ये परिवर्तन करण्यास रुपया उपलब्ध आहे. या नियंत्रांणाचे कारण भारताच्या पूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडित आहे.
रिझर्व्ह बँकेने अजूनही crypto करन्सीला चलन म्हणून मान्यता दिलेली नाही. सुप्रसिद्ध वकील निशीत देसाई आणि असोसिएट हे काही crypto करन्सी आशिलांतर्फे तिला मान्यता मिळावी म्हणून हा लढा रिझर्व्ह बँकेबरोबर लढत आहेत. पण त्याच बरोबर crypto करन्सीवर बंदी आणणार नाही असे रिझर्व्ह बँकेने सुप्रीम कोर्टात जाहीर केले आहे. याचे कारण निशीत देसाई यांचे म्हणणे आहे की क्रीपटो करन्सी ही करन्सी न मानता ती पूर्वीच्या बार्टर सिस्टीम मधील एक मालमत्ता मानावी. नाहितरी करन्सी चा उगमच बार्टर सिस्टीम मधून झाला जो देवाण घेवाण करण्यासाठी झाला आहे, मग ही अजून एक मालमत्ता म्हणून स्वकरायला काय हरकत आहे.
परंतु ती स्थावर मालमत्ता नसून ती वरचुल ( आभासी) मालमत्ता आहे. ती फक्त कागदावर ( किंवा कॉम्प्युटर वर म्हणा) आहे. त्याचा भाव बदलणे, त्यात ट्रेडिंग होणे हे सर्व व्यवहाराचे( कॉमर्स ) चे भाग झाले पण मुळात ती मालमत्ता अस्तित्वात आहे का? जसे की एखादी कम्पनी आपण काढली आणि त्याचे शेयर बाजारात विकले आणि त्याचा वायदेबाजार, किंवा सर्व प्रकारचे देवाण घेवाणाचे व्यवहार आपण केले. ज्या कम्पनी चा मालक नाही, ज्याचे उत्पादन नाही, ज्याची मालमत्ता नाही अशा कम्पनिमध्ये आपण आपले पैसे गुंतवावे का? जर काही मूठभर लोक त्यात व्यवहार करण्यात मजा मानतात तर तो त्यांचा आपसातील व्यवहार होऊ शकतो. अर्थात अशा क्रीपटो करन्सी चे वापरकर्ते वाढत आहेत, त्याचे चलनवलन होत आहे ते सुद्धा जगभरात, अनेक देशात, ही जरी आसचऱ्याची बाब असली तरी ती सत्य परिस्थिती आहे.
रहाता राहीला प्रश्न या मागील विचारधारेचा.
आज जगाची अर्थव्यवस्था जी चालली आह तीे त्या मध्ये चलन, सर्व प्रकारच्या मालमत्ता, सोने, नाणे, जमीन जुमला, सर्व प्रकारचे live stock, सर्व प्रकारची उत्पन्न वगैरे वर अवलंबून आहे. प्रत्येक देशाची आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणामांवर अवलंबून असते आणि त्याचे अंशात्मक प्रतीक म्हणून आपण आपला रुपया, किंवा डॉलर, किंवा आणखी काही करन्सी चे मूल्य म्हणून समजतो. आपण या सर्वाला एका मोठ्या खेळाचा भाग मानुया. जगाच्या या खेळाचे काही सर्व मान्य नियम आहेत आणि ते मान्य करून सर्व देश एकमेकाशी व्यवहार करत आहेत त्यामुळे ही जागतिक अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे.
आता या अर्थव्यवस्थेबरोबर दुसरी एक वरचुल ( आभासी) व्यवस्था सुरू झाली आहे ती म्हणजे
क्रीपटो करन्सी. त्या खेळाचे सुद्धा काही नियम आहेत. त्या मध्ये त्याचा कोटा प्रत्येक क्रीपटो करन्सीने फिक्स ठेवला आह त्यामुळे त्याचे मूल्य त्याच्या मागणी आणि पुरवठादार वर अवलंबून आहे. पण अशा अनेक क्रीपटो करन्सी काढायला कोणतीही बंदी नाही. ज्याचा जास्त वापर किंवा मागणी, ती क्रीपटो करन्सी जास्त भाव घेते. या करन्सी ला कोणतेही मूळ मूल्य ( intrinsic value) नाही.
थोडक्यात हा एक नवीन समांतर खेळ आहे जो आपल्या सध्याच्या जागतिक खेळात घुसायला बघत आहे आणि त्याने काही प्रमाणात शिरकाव सुद्धा केला आहे आणि तो म्हणतो मला पण यात सामील करून घ्या. आता त्याच्याबरोबर आपण खेळायचे की नाही, थोडक्यात आपण क्रीपटो करन्सी मध्ये व्यवहार करायचा का नाही या बद्दल रिझर्व्ह बँकेने अजून कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत.
पण खरोखरच हा खेळाडू आपले नियम वापरून बाकीच्या जागतिक खेळाडूंबरोबर आपला खेळ सुरू ठेवू शकेल का हे बघण्यालायक आहे. कारण कोणतेही मूळ मूल्य ( intrinsic value) नसताना फक्त आणि फक्त तांत्रिक ज्ञान, वैचारिक विविधता, आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करत असलेला हा खेळाडू काय करामत करू शकतो हे 21 व्या शतकातील मोठे आव्हान आहे. जुन्या जमान्यांचे जागतिक अर्थ तज्ज्ञांनी या खेळाडू पुढे गुढघे टेकले असून अनेक ठिकाणी त्याला स्वेच्छेने किंवा नाईलाजाने आपल्यात समाविष्ट करून घेतला आहे हे सत्य आहे.
हा लेख आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा.
माधव भोळे
No comments:
Post a Comment